Description
लुइसा मे अलकॉट या ख्यातनाम अमेरिकन लेखिकेची ‘लिटल् वुइमेन’ ही कादंबरी अठराशे अडुसष्ट साली प्रथम प्रकाशित झाली. प्रसिद्धीबरोबरच तिला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली. अनेक भाषांमधून ती अनुवादित झाली आहे. ही अमेरिकेतल्या ‘मार्च’ कुटुंबाची – विशेषत: त्यातल्या मेग, ज्यो, बेथ आणि अॅमी या चार बहिणींची – कहाणी आहे. हे एक अतिशय हृद्य आणि विलोभनीय असे कुटुंबचित्र आहे.