Description
क्षमता आणि आवड यानुसार सुयोग्य करिअरची निवड हा जीवनातील यशस्वितेचा पाया
असतो. उभ्या आयुष्याचा फैसला मात्र केला जातो, तुटपुंज्या माहितीवर! अनेकांना फक्त
हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच करिअर्स माहिती असतात. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स,
मेडिकल सायन्स, इंजिनिअरिंग, बिझनेस मॅनेजमेंट… बस्स इतकंच काहीसं !
लक्षात घ्या, अशा ७००हून अधिक करिअर्स आहेत आणि ३०,००० हून अधिक कोर्सेस आहेत.
प्रत्येक माणूस हा विशिष्ट शारीरिक-भावनिक-बौद्धिक-सामाजिक-आत्मिक-
‘बुद्धिमतांचा कॉम्बो’ असतो; आणि प्रत्येक करिअरला विशिष्ट कॉम्बोची गरज असते. या
दोन्ही गोष्टी मॅच केल्या की झाले; तुम्ही त्या क्षेत्रात हिरो होणारच ! करिअर निवडीची दिशा
चुकल्यास मात्र पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
एकविसावं शतक स्पेशलायझेशनचं आणि आपण निवडलेल्या क्षेत्रात उंच उंच जाण्याचं !
तुम्ही त्याच क्षेत्रात उंच जाऊ शकता ज्या क्षेत्रासाठी लागणारा विशिष्ट बुद्धिमत्तांचा कॉम्बो
तुमच्यात निसर्गतःच आहे. म्हणूनच योग्य करिअर निवडताना त्या व्यक्तीतील विशेष
बुद्धिमत्ता लक्षात घ्यायलाच हव्यात; कारण प्रत्येक मेंदूचं डिझाईन वेगळं असतं !
निरीक्षण, अनुभव यासोबत मानसशास्त्रीय चाचण्या अर्थात सायकॉलॉजिकल टेस्टस्,
व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
करिअर सक्सेस प्लॅन साठी महत्त्वाचा आहे शोध व्यक्तिमत्त्वाचा! ज्यामुळं होईल
ओळख आपुली आपणाशी!
आणि सापडेल दिशा जीवनाची!
करिअरची योग्य निवड, निर्णय, नियोजन आणि निश्चितता यासाठी प्रत्येकानं वाचलंच
पाहिजे असं पुस्तक….