Description
देव हे परग्रहावरील अतिमानव होते का? या संदर्भात वेदवाङ्मय कोणते निर्देश देतं? आकाशातून येणाऱ्या अवकाशयानांचे दिवे पाहून यानांच्या चालकांना 'देव' म्हटलं गेलं होतं का? रामायण, महाभारत, योगवासिष्ठ, समरांगण सूत्रधार इत्यादी प्राचीन ग्रंथांमध्ये कोणते पुरावे लपले आहेत? इंका, माया, सुमेरियन, इजिप्शियन संस्कृती देवांच्या पृथ्वीवरील वास्तव्याचे कोणते पुरावे देतात? सप्तलोकांचं स्वरूप काय आहे? परमेश्वराचा प्रांत कसा आहे? मृत्यूनंतरचे जीवन कसं आहे? आनंदस्वरूप प्रांताचा स्पर्श होण्यासाठी काय केलं पाहिजे? या आणि अशा अनेक विषयांचा तौलनिक अभ्यासातून सिद्ध केलेलं सर्वस्वी अनोखं रसिकमान्य पुस्तक.