Description
शालेय जीवनात गीतांचे फार महत्त्व आहे.
मूल शाळेत जाण्यापूर्वी आई त्याच्याकडून बोबडेपणीच बडबडगाणी वदवून घेते.
शाळेत प्रार्थनेने गीतांची ओळख होते.
विविध कार्यक्रमांतून मुलं कृतिगीतं सादर करू लागतात.
शाळेतील विविध समारंभासाठी स्वागतगीते गायली जातात.
पुढे देशभक्तिगीते, समूहगीते, मनोरंजनपर गीतांद्वारे शालेय गीतांचा अखंड प्रवास सुरू असतो.
अशा विविध गीतांचा हा संग्रह शाळेतील मुलांसाठी, पालकांसाठी आणि शाळेतील शिक्षकांसाठी खास तयार केला आहे.
ही गीते म्हणजे भारतीय संस्कृतीचा वारसाच आहे.
या गीतांच्या माध्यमातून मुलांवर सहजरीत्या नीतिमूल्यांची रुजवण होत असते.
आज मुलांना दूरदर्शनच्या विळख्यातून बाहेर काढून उत्तम गीतांच्या माध्यमातून त्यांच्यावर सुसंस्कार करणे ही काळाची गरज आहे. मुले घडविण्यात या गीतांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. समाजपरिवर्तनाच्या वाटचालीत मुलांवर नीतिमूल्यांचे संस्कार करणे, त्यांच्या मनात देशभक्ती रुजविणे अपरिहार्य आहे.
हा १०१ शालेय गीतांचा संग्रह मुलांना आनंददायी व मोलाचा ठरेल. यामधील प्रार्थना, राष्ट्रगीत, ध्वजगीते आणि देशभक्ती, मनोरंजन, नीतिमूल्ये यावर आधारित गीते; तसेच धार्मिक व बालगीते यामुळे मुलांवर अनेक सुसंस्कार करणे सहज शक्य होते.
आजची बालके उद्याचे नागरिक आहेत. म्हणून ही वैविध्यपूर्ण शालेय गीते मुलांचे व्यक्तिमत्त्व सुसंस्कारी व देशहितोपयोगी असे घडविण्यास निश्चितच उपयुक्त ठरतील.
————————————————————————————————————————-
मुलांना गोष्टी ऐकण्याची जन्मजात आवड असते. वाढत्या वयाबरोबर पुस्तके वाचण्याचा त्यांना छंद जडतो. मुलांची वाचण्याची आवड जोपासण्याकडे पालकांनी डोळसपणाने बघून त्यांच्या हाती उत्तम पुस्तक देणं गरजेचं असतं.
एखादी शिकवण मुलांना उपदेशासारखी न देता मनोरंजक गोष्टीच्या रूपातून देण्याची आपली पारंपरिक पद्धत विलक्षण परिणामकारक आहे.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य वयात योग्य संस्कार होणे गरजेचे असते.
बोधप्रद आणि रंजक गोष्टींमुळे मुलांचा भावनिक, बौद्धिक आणि नैतिक विकास तर होतोच; शिवाय मुलांची कल्पनाशक्तीही वाढते.
प्रस्तुत पुस्तकात मुलांच्या करमणुकीबरोबरच योग्य शिकवण देणाऱ्या निवडक गोष्टींचा समोवश करण्यात आला आहे.