Description
समग्र मराठी साहित्य-परंपरेमध्येच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरदेखील विजय तेंडुलकर यांचे स्थान 'लेखक' म्हणून अढळ व अनन्यसाधारण आहे. नाटक, कथा, कादंबरी, एकांकिका, ललितगद्य व पटकथा - संवाद अशा सर्व लिखित व दृक् - श्राव्य माध्यमांवर तेंडुलकरांनी आपल्या अम्लान प्रतिभेची लखलखीत मुद्रा उमटवली. समकालीनता व सार्वकालीनता समर्थपणे अभिव्यक्त करणाऱ्या तेंडुलकरांच्या साहित्याचे अर्थनिर्णयन व पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न एकूण सोळा लेखकांनी अंत:स्फूर्तता आणि वैचारिकता यांचा मेळ घालत येथे केला आहे. कारण कटू सत्याचे प्रयोग करणारे 'तें' तथा तेंडुलकर अ-जून, आजही प्रस्तुत ठरतात.