Description
मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढावी, म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक अभिनव उपक्रम राबविणाऱ्या एका शिक्षकाने लिहिलेल्या या कथा ! ग्रामीण मुलांचं भावविश्व उलगडताना त्यांची स्वप्नं, जिद्द आणि आकांक्षा यांचं उत्कट दर्शन या पुस्तकात घडतं. स्थानिक बोली अन् ग्रामीण मातीचा गंध असलेल्या या कथा ग्रामीण आयुष्याचे अनेक पदर ठळकपणे वाचकांसमोर आणणाऱ्या आहेत.