Skip to product information
1 of 1

Aaj Shalet Kay Vicharle? By Kamala V. Mukunda Translated By : Arundhati Chitale

Aaj Shalet Kay Vicharle? By Kamala V. Mukunda Translated By : Arundhati Chitale

1. आपला मेंदू अनुभवातून लवकर शिकतो, तर शाळा पुस्तकी शिक्षणावर भर देते. शाळेत जाण्याआधीपासूनच लहान मूल जीवशास्त्र, पदार्थविज्ञान, मानसशास्त्र हे शिकतच असतं. पण शाळा त्यांच्या त्या आकलनाकड पूर्णपणे दुर्लक्ष करून...

Regular price Rs. 290.00
Sale price Rs. 290.00 Regular price Rs. 320.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Sub total

Rs. 290.00
View full details

1. आपला मेंदू अनुभवातून लवकर शिकतो, तर शाळा पुस्तकी शिक्षणावर भर देते.
शाळेत जाण्याआधीपासूनच लहान मूल जीवशास्त्र, पदार्थविज्ञान, मानसशास्त्र हे
शिकतच असतं. पण शाळा त्यांच्या त्या आकलनाकड पूर्णपणे दुर्लक्ष करून त्यांना
शास्त्रीयदृष्ट्या बरोबर ज्ञान' देण्याचा प्रयत्न करते.
2. स्मृती ही विधायक व स्पष्टीकरणात्मक असते. शाळा मात्र शिकलेल्या अभ्यासक्रमाचे पुनर्उत्पादन करण्यावर भर देते.
3. स्मरणशक्ती व मिळणारे शिक्षण यापासून भावना वेगळ्या करता येत नाहीत. पण शाळा मात्र शिक्षणातील भावनिक बाजूकडे पार दुर्लक्ष करते.
ही आहेत आपल्या शैक्षणिक अपयशाची काही कारणं. या आणि अशाच काही कारणांचा मानसशास्त्रीय अंगाने उहापोह करणारं हे पुस्तक आहे.
स्मरणशक्ती, शिकण्याची प्रक्रिया, प्रज्ञा, मुलांची वाढ व मानसशास्त्रातीलइतर बाबी आपल्याला बरेच काही सांगू शकतात. किंबहुना एक उत्तम
पालक, एक उत्तम शिक्षक होण्यास त्यांची आपल्याला फार मोठी मदत होऊ शकते, असं सांगत हे पुस्तक बालशिक्षणाकडे बघण्याचा एक वेगळाच
दृष्टिकोन आपल्याला बहाल करतं. शिक्षणाबद्दल आस्था बाळगणाऱ्या आणि शिकण्या-शिकवण्याची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येकाने वाचावं असं हे पुस्तक आहे.