Description
1921-27 या काळात बांधलेल्या संसदेच्या भव्य आणि गोलाकार इमारतीत स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात
संसदेचे कामकाज सुरू होते. वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही ऐतिहासिक वास्तू म्हणजे भारतीय लोकशाहीच्या जडणघडणीची
खरीखुरी साक्षीदार आहे. आता 2023 पासून आपल्या संसदेचे कामकाज नव्याने बांधण्यात आलेल्या संसद भवनातून सुरू झाले आहे.
या पार्श्वभूमीवर भारताच्या जुन्या संसद भवनाची आणि संसदीय कामकाजांची कुमार वाचकांसाठी सचित्र ओळख करून देणारं पुस्तक.