Description
सशस्त्र सेनेतील आयुष्य म्हणजे वेगळ्याच जगात जगणे. एकीकडे क्षणाक्षणाचा आनंद पुरेपूर उपभोगण्याची वृत्ती; तर दुसरीकडे डोक्यावर युद्धाची, मृत्यूची टांगती तलवार. कडक करड्या शिस्तीबरोबर धाडसी बेदरकारी. रक्ताच्या नात्यापासून दूर असूनही, जिवाभावाचे जुळणारे बंध. मध्यमवर्गीय नागरी कुटुंबात, सुरक्षित कोशमय वातावरणात, स्वच्छंदी फुलपाखरी जीवन जगणारी मुलगी विवाहानंतर एका सेनाधिकाऱ्याची पत्नी झाली आणि अचानक एका आयुष्यपालटाला सामोरी गेली. आपल्या या 'फौजी' आयुष्याची तिने टिपलेली क्षणचित्रे. आम्ही फौजी