Description
'इंग्रजी चांगल्या पध्दतीने लिहायला-बोलायला येण्यासाठी मोठा शब्दसंग्रह अवगत हवा आणि अपेक्षित भाव समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचावा म्हणून कोणता शब्द कोठे व कसा वापरावा, हेही समजायला हवे. नेमके असेच मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे. ‘साप्ताहिक सकाळ’ या नियतकालिकतून सतत गेली कित्येक वर्षे प्रकाशित होत असलेल्या अत्यंत लोकप्रिय सदरातील लेखांचे हे वाचकांच्या आग्रहास्तव प्रसिध्द होणारे संकलन आहे. यापूर्वी प्रकाशित झालेल्या चार भागांप्रमाणेच हा पाचवा भागही तरूण विद्यार्थ्याप्रमाणे जिज्ञासू वाचकांनासुध्दा अत्यंत उपयुक्त वाटेल, यात शंका नाही. हे पुस्तक घ्या, वाचा आणि शब्दांची ‘इंग्रजी श्रीमंती’ साध्य करा...