Description
गेल्या तीन शतकांत आपलं वर्तन अधिकाधिक निसर्गविरोधी बनत गेलं आहे, नि त्यामुळेच समस्याही वाढत गेल्या आहेत. ह्या निसर्गविरोधी वर्तनाला कारणीभूत आहे विकासाची चुकीची संकल्पना, विकासनीती आणि जीवनशैली. त्यांना विरोध करणारं आणि संयमित उपभोगाच्या जीवनशैलीचा पुरस्कार करणारं लेखन ‘गतिमान संतुलन’ ह्या मासिकातून प्रकाशित होतं. त्याच्या अंतिम ८ वर्षांतील संपादकीय लेखांचं संकलन ह्या तिस-या भागात आहे : सर्वांची जीवनशैली अधिकाधिक निसर्गस्नेही बनत जावो, ह्या कृतिशील परिवर्तनाच्या अपेक्षेनं केलेलं