Description
ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका. एका बाजूला नवी सुखे अन् नव्या संधी देणारे तंत्रज्ञान, नवी क्षितिजे धुंडाळणारी अवकाशयाने; तर दुसरीकडे अस्तित्वावरच आघात करू पाहणारी विनाशकारी अस्त्रे ! कोणत्या दिशेने घडणार मानवाचा प्रवास ? भविष्यवेध तंत्रज्ञान अवकाश युध्दशास्त्र