Description
'सर्वनाश झाल्याशिवाय ‘नवं’ निर्माण होत नाही. गडद अंधार होतो तेव्हाच प्रकाशाच्या आगमनाची चाहूल लागते. हा निसर्गाचा नियम आहे! आज सगळीकडे दिसतो आहे तो दु:खाचा, अशांततेचा, हिंसेचा उसळलेला प्रचंड आगडोंब... बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा आपण केलेला पराभव! पण तरीही बुद्ध हसतो आहे... आणि म्हणतो आहे, ‘‘पाहा, माझ्या येण्याचा रस्ता तुम्ही मला मोकळा करून देत आहात. मी येणारच आहे. माझं येणं अटळ आहे आणि मी यावं अशी परिस्थिती तुम्ही निर्माण केली आहे..’’