Description
'नवा उद्योग सुरू करणे असो अथवा चालू उद्योग वाढवणे असो, उद्योजकाच्या पुढ्यात ठाकलेले असतात अडचणींचे डोंगर. त्यांच्यावर मात करायची; तर मनात हवा ध्यास, सायासात हवे सातत्य अन् डोक्यात हवी उत्तमाची आस. या ध्येयाने झपाटलेले समविचारी उद्योजक एकत्र आले, तर निर्माण होते एक वैशिष्ट्यपूर्ण चळवळ. ती केवळ आर्थिक यशाची शिखरे गाठत नाही, तर ‘सर्वोत्तमा’चे गौरीशंकर नजरेसमोर ठेवते. उद्योगक्षेत्राला नैतिक मूल्यांचा भक्कम पाया पुरवते. सतत उंचावणा-या दर्जाव्दारे उद्योगाची इमारत सुदृढ बनवते. संपूर्ण भारतीय उद्योगक्षितिजाला एक वेगळी झळाळी देण्याची क्षमता असलेल्या या चळवळीचे नाव आहे - टीएलसी. तरुणाईसाठी उद्योजकतेचा नवा मंत्र सांगणा-या या अनोख्या ‘टीएलसी समुदाया’ची ओळख करून देणारे टीएलसी - टीचिंग लर्निंग कम्युनिटी '