Description
ही आहेत वेगवेगळी चित्रे. काही कणचित्रे, काही क्षणचित्रे, काही स्मरणचित्रे, काही कल्पनाचित्रे. काही अतीतात खोल बुडी मारणारी, काही भविष्यक्षितिजापार डोकावणारी. काही आजच्या नैमित्तिक आयुष्याची. काही चिरंतनाला स्पर्श करण्याची असोशी बाळगणारी. या चित्रांमध्ये साकारलेल्या रेखा शब्दांच्या या चित्रांत भरलेले रंग अर्थांचे या चित्रांची रचना भावभावनांची अन् मुक्त कल्पनांची. अशा नित्यनूतन चित्रचौकटींनी सजलेला कॅनव्हास