Description
स्वतःच्या मूळ खेडेगावातच
दवाखाना थाटणारा तरुण डॉक्टर.
आपल्या ज्ञानाच्या मर्यादा जाणणारा.
अडचणींवर मात करून बस्तान बसवतो.
स्वतःचं गाव त्याला वेगवेगळ्या
रंगाढंगात सामोरं येत जातं.
शेतीतली परवड ऐकू येते आणि
प्रयोगही दिसतात.
कोपऱ्याकोपऱ्यातलं पुराणं दारिद्र्य जाणवतं, तशीच नवश्रीमंतीही दिसते.
दबा धरून बसलेली पारंपरिक सावकारी आणि चकचकणारी आधुनिक दुकानदारी !
रिकामटेकड्या तरुणांचं टोळकं,
ज्येष्ठ लष्करी अधिकारी,
आजारग्रस्त म्हातारी माणसं !
सणवार, लग्न, देवदेवस्की,
तीर्थयात्रा, मर्तिकं !
या सगळ्या गुंतागुंतीच्या
ग्रामीण प्रवाहातून वाट शोधत
पुढे पुढे जाणारं डॉक्टरचं जीवन !
दवाखाना थाटणारा तरुण डॉक्टर.
आपल्या ज्ञानाच्या मर्यादा जाणणारा.
अडचणींवर मात करून बस्तान बसवतो.
स्वतःचं गाव त्याला वेगवेगळ्या
रंगाढंगात सामोरं येत जातं.
शेतीतली परवड ऐकू येते आणि
प्रयोगही दिसतात.
कोपऱ्याकोपऱ्यातलं पुराणं दारिद्र्य जाणवतं, तशीच नवश्रीमंतीही दिसते.
दबा धरून बसलेली पारंपरिक सावकारी आणि चकचकणारी आधुनिक दुकानदारी !
रिकामटेकड्या तरुणांचं टोळकं,
ज्येष्ठ लष्करी अधिकारी,
आजारग्रस्त म्हातारी माणसं !
सणवार, लग्न, देवदेवस्की,
तीर्थयात्रा, मर्तिकं !
या सगळ्या गुंतागुंतीच्या
ग्रामीण प्रवाहातून वाट शोधत
पुढे पुढे जाणारं डॉक्टरचं जीवन !