Description
मला सांगा, गोव्यात काय नाही हा प्रश्न विचारणारा मुशाफिर तुम्हांला वेगळाच गोवा दाखवतोय. त्यामुळे गोवा पर्यटनाच्या अधिकृत गाइडमध्ये जी आणि जेवढी माहिती असते, ती आणि तेवढी तुम्हांला या पुस्तकात कदाचित सापडणार नाही. पण गोव्याला जायला हवं, अमुकतमुक पाहायलाच हवं, ही ओढ मात्र हे पुस्तक तुमच्या मनात नक्की निर्माण करेल. स्वच्छंदीपणे, अगदी मनासारखा ज्यांना गोवा फिरायचाय, त्यांना इथे आणखी केवढं, काय-काय आहे याची झलक नक्की यातून मिळेल.