Description
'माणसाचे चार पायांचे नातलग मुक्याने सुखनैव जगत असताना माणसालाच बोलण्याची गरज का आणि कधी भासू लागली? माणसाची अगदी सुरुवातीची भाषा कशी होती? पृथ्वीतलावर एवढ्या वेगवेगळ्या भाषा का निर्माण झाल्या? त्या सगळ्या कुणा एकाच आद्य भाषेपासून तयार झाल्या का? लहान मुले त्यांची मातृभाषा मुद्दाम न शिकवतासुद्धा इतकी अचूक कशी काय बोलतात? जगातल्या भाषांची संख्या झपाट्याने कमी का होत आहे? कोणत्या भाषा काळाच्या ओघात टिकून राहतात? भाषांचे आयुष्यमान कशावर अवलंबून असते? या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे ‘चालता-बोलता माणूस’ मध्ये सापडतील. शिवाय त्यात मिळेल माणूस ‘बोलका’ होण्याचा इतिहाससुद्धा. '