Description
हा ग्रंथ संक्षेपामध्ये नृत्याशी निगडित असलेल्या अभिनयाचा विचार करतो, विवेचन असे नाही. जणू काही एखाद्या ग्रंथाचा विस्ताराने खोलवर जाऊन अभ्यास केलेला असावा आणि मग त्यातली तथ्ये केवळ सांगायची झाल्यास त्यातले महत्त्वाचे मुद्दे नोंदलेले असावेत, तसा हा प्रकार आहे. त्यामुळे या ग्रंथात प्रकरणे नाहीत, पण ४८/ ५० मुद्दे आहेत, ज्यांची थोडी विचक्षणा करता पुरा विषय आपल्या मन:चक्षूंसमोर तरळून जाऊ शकतो. थोडक्यात हे पुस्तक म्हणजे एक परिभाषा विंâवा व्याख्याकोश आहे. त्यात कोणत्याही प्रक्रियेचे विवेचन, स्पष्टीकरण असे दिलेले नाही, काही गोष्टी व्याख्या आणि विनियोग यांचा एकत्र विचार केल्यास सहज समजून जातात; विंâवा जणू मुद्दे काढून ठेवलेले आहेत आणि त्यांकडे वेळोवेळी निर्देशही केलेले आहेत. थोडक्यात हा एक संज्ञा संग्रह आहे.