Description
विशेषणांची उधळण केली, तरीही ज्यांचे वर्णन पुरे होऊ शकणार नाही, अशा शिवाजी महाराजांचा सर्वाधिक लक्षणीय गुणविशेष म्हणजे त्यांचे युद्धनेतृत्त्व! राजांनी असंख्य लहानमोठे विजय मिळवले त्यांना काही बोचरे पराभव पत्करावे लागले. पण त्या पराभवांचे विजयात रूपांतर करण्याची किमया त्यांनी करून दाखवली. तो पराक्रम घडवतानाच त्यांनी जे डावपेच लढवले, ज्या युक्त्या प्रयुक्त्या योजल्या, ज्या व्यूहरचना आखल्या, त्यांचे लष्करी विश्लेषण करून दाखवणारा हा ग्रंथ. प्राचीन - अर्वाचीन युध्दशास्त्राच्या लष्करी सूत्रांच्या प्रकाशात महाराजांच्या अलौकिकत्वाचे झळाळते दर्शन घडवणारा आणि जागतिक सेनानीच्या नामावळीत त्यांचे अग्रहक्काचे स्थान अधोरेखित करणारा हा ग्रंथ प्रत्येक शिवप्रेमी देशभक्ताच्या संग्रही हवाच! जयतु शिवाजी जयतु शिवाजी