Description
इतरांची आत्मसंतुष्टता अणि अल्पसंतुष्टता लेखकाला भेटू शकत नाही. इतरांसारखे मन:स्वास्थ त्याच्या वाट्याला असत नाही. अज्ञानात सुख असेल, तर लेखक बहुतेक, आयुष्य दु:खात आणि तापात काढतो. प्रिया ही दु:खे शोधत जाते. तिचे आतापर्यंतचे छोटे आयुष्य म्हणजेच दु:खांच्या शोधातला एक ‘प्रयोग’ किंवा अनेक प्रयोगांची मालिका आहे. शब्द देता येतात. लिहिण्याची हौसही देता येईल. शैली तर दिली–घेतली जातच असते. परंतु जगण्याचा आशय देता येत नाही. हा आशय ज्याचा त्याने ‘कमवावा’ लागतो, तो मिळवण्याची ईर्षा मुळातच असावी लागते. या अर्थाने प्रिया तेंडुलकर हिचे या पुस्तकातील लेखनकर्तृत्व तिचे स्वत:चे, स्व-कमाईचे आहे.