Description
'स्त्री-पुरुष असा भेद करत, स्त्रीचा जेवढा वापर करणं शक्य आहे तेवढा करत आणि ‘पायातील वहाण पायातच राहिली पाहिजे, असं म्हणत साऱ्या धर्मांनी स्त्रीला तुडवता येईल तितकं तुडवलं. समस्त पुरुषजातीला मोक्ष मिळवून देताना समस्त स्त्रीजातीचं जगणं अत्यंत हलाखीचं करून टाकण्याचं काम सर्व धर्मांकडून घडलं, हे एकाही धर्मसंस्थापकाला, एकाही महापुरुषाला कसं खटकलं नाही? त्याच्या ‘करुणास्वरूपाला त्यामुळे लांच्छन कसं लागलं नाही? इतकं जीवघेणं दु:ख स्त्रीच्या पदरात टाकूनसुद्धा हे ‘महापुरुष माणुसकीच्या, तत्त्वज्ञानाच्या गप्पा कोणत्या अधिकाराने करीत राहिले? स्वत:ला ‘करुणामयी कसे म्हणवून घेत राहिले? की ‘माणसाच्या कल्याणाचा विचार करताना ‘स्त्री त्यांच्या हिशोबातच नव्हती?