Description
'महाराष्ट्र. नावातच राष्ट्र असणारे आणि स्वाभाविकपणे संकुचितपणाला थारा न देणारे राज्य... व्यापक विचारांचे शतकानुशतके संस्कार होत गेल्यामुळे पुरोगामी प्रतिमा मिरवणारे. या नावामागे उभी आहे एक जिवंत संकल्पना. इतिहासकाळापासून अस्तित्वात असणारी आणि तरीही वेळोवेळी बदलत जाणारी... विविध साधुसंतांनी आणि विचारवंतांनी आपापल्या परीने सजवलेली, रुजवलेली... महाराष्ट्रधर्म ही तिची उपशाखादेखील वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून मांडली गेलेली. स्वतंत्र भारतात भाषा हा आधार मानून राज्यांची पुनर्रचना झाली, तेव्हा महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याची भावना बळावली. त्या असंतोषातून उभी राहिली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. त्या चळवळीला बहुतांशी यश मिळाले आणि आजचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्या घटनेला तब्बल ५० वर्षे उलटून गेल्यानंतर कोणते चित्र दिसते आहे आणि काय दिसायला हवे, या दोन प्रश्नांच्या अनुरोधाने चिकित्सक पण विधायक दृष्टीकोनातून केलेली ही साधार चर्चा. विचारांना प्रवृत्त करणारी आणि दिशा दाखवणारीही...