Description
'महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे हे दोन लोकोत्तर नेते. प्रत्यक्ष जीवनात जरी ते दोघे अनेकदा समोरासमोर उभे ठाकले, तरीही आता नव्या संदर्भात त्या दोघांच्या विचारांचा समन्वय घालून प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करणे गरजेचे आहे. हे दोन्ही महापुरुष दोन ध्रुवांसारखे लांब आहेत, असे वाटते; तथापि त्यांचे शाश्वत संदेश लक्षात घेऊन त्यांमध्ये सुसंवाद कसा साधता येईल, याचा हा प्रामाणिक प्रयत्न. '