Description
'आज भारतात सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया आघाडीवर आहेत. परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुली बाजी मारताना दिसत आहेत. एका बाजूला ही उत्साहवर्धक स्थिती, तर दुसऱ्या बाजूला बहुसंख्य स्त्रियांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अजूनही झगडावे लागते आहे, तारेवरची कसरत करावी लागते आहे. कधीकधी तर ही कसरत खुद्द न्यायसंस्थेलाच करावी लागते आहे की काय, अशी परिस्थितीसुद्धा उद्भवते. या परिस्थितीतून मार्ग काढू इच्छिणाऱ्या सर्वांना हवी असते कायद्यांबद्दलची नेमकी माहिती. स्त्रीचे हक्क अबाधित राहावेत, तिला जगण्याचे बळ लाभावे या हेतूने राज्यघटनेपासून भारतीय दंड विधानापर्यंत आणि केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत अनेकांनी भरपूर तरतुदी केल्या आहेत, योजना आखल्या आहेत. त्या सर्वांची तपशीलवार माहिती देणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक.