Description
आइनस्टाइनचं नाव तुम्ही ऐकलंय ना? वा, हे काय विचारणं झालं? अहो, गेल्या शतकातला सगळ्यांत महान शास्त्रज्ञ. बरोबर. विस्कटलेले केस, वेधक पण दयाळू डोळे, गबाळा पोशाख ही त्याची छबी आपल्या परिचयाची. पण त्याच्या संशोधनाबद्दल काही माहिती आहे का? हां, ते सापेक्षता, अवकाश-काल संबंध असं काहीतरी सांगितलं ना त्यानं? `असं काहीतरी' वर थांबू नका. सगळ्या विश्वाकडे पाहण्याची नवी नजर देणा-या या क्रांतिकारक संशोधनाची ओळख करून घ्या. पदार्थविज्ञानातील जुन्या संकल्पना बाजूला सारणा-या व विश्वातील अनेक कोड्यांची उत्तरं शोधणा-या संकल्पनेची सोप्या भाषेत करून दिलेली ओळख. सापेक्षता