Description
मुंबईहून न्यूयॉर्कला निमिषार्धात साधतो संपर्क. हजारो किलोमीटर अंतरावर चाललेली क्रिकेट मॅच बघता येते आरामात घरबसल्या. माणसाचं शरीर असो वा दुसरं एखादं गुंतागुंतीचं मशीन - डोकावून बघता येतं त्याच्या अगदी गाभ्यात. माणसाच्या रोजच्या आयुष्यातले हाल, कष्ट पुष्कळसे कमी करण्याचं, माणसाला अनेक नव्या किमया उपलब्ध करून देण्याचं काम करतं तंत्रज्ञान. माणसाचं सारं जीवन बदलून टाकणा-या या क्षेत्राचं आजचं बहुविध रूप रेखाटणारं पुस्तक. तंत्रज्ञान