Description
कादंबरीकाराची कसोटी कथानकरचनेपेक्षा पात्रचित्रणामध्ये जास्त लागते. राईलकरांसारखा नवा कादंबरीकारसुध्दा या कसोटीत यशस्वी होताना दिसतो. राईलकरांनी चित्रित केलेली पात्रं सरळ असली, तरी त्यांचं चित्रण उथळ नाही. बाह्यात्कारी मौनाचे क्षण टिपताना अंतरीच्या खोल खळबळीचं भान राईलकरांना पुरेसं असतं, हे सहृदय वाचकांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. या कादंबरीतला आणखी एक आनंद देणारा भाग म्हणजे तिच्यातल्या जीवनदर्शनाला असलेलं वैज्ञानिकतेचं अस्तर. मूत्रपिंड आरोपणाच्या शस्त्रक्रियेच्या आगलामागला तपशील या कादंबरीतल्या मनोज्ञ जीवनदर्शनाला एक वेगळंच बौध्दिक परिमाण प्राप्त करुन देतो. या योगे मराठीतल्या विज्ञानकथांच्या दालनामध्ये मोलाची भर पडू शकेल. ‘मानसकन्या’च्या निमित्तानं, मराठी साहित्यक्षेत्रात स्थिरपद होऊ शकेल असा एक नवा लेखक पुढे येत आहे. त्याच्याकडून अधिक अपेक्षा करावी, आशा बाळगावी, इतपत निर्वाळा प्रस्तुत कादंबरी