Description
मुंबईचे डबेवाले म्हणजे त्या महानगराची ‘लाइफलाइन’च जणू... लाखो मुंबईकरांना वर्षानुवर्ष ‘लंचटाइम’मध्ये रोज अगदी घरचं जेवण डब्यांतून पुरवणारी ही मराठमोळी यंत्रणा आता जगभर गाजते आहे... ‘सिक्स सिग्मा’ या जगप्रसिद्ध व्यवस्थापनप्रणालीचं त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे! अर्धशिक्षित माणसांनी घडवलेला अचूक ग्राहकसेवेचा तो आविष्कार ब्रिटनच्या प्रिन्स चाल्र्सनासुद्धा प्रभावित करणारा ठरला आहे. रघुनाथ मेदगे या कुशल संघटक नेत्याचे स्वानुभव आणि शोभा बोंद्रे या शब्दांकनप्रभू लेखिकेची निरीक्षणे अशा दुहेरी गुंफणीमुळे अधिकच वाचनीय बनलेली ही रंजक कथा...