Description
'मीरा: मि. नेने, मुलांच्या एकेका वयाचा खास असा गुणधर्म असतो. लहानपणी आपल्या पालकांइतके शक्तिवान पालक जगात कोणाचेच नसतील, असंच मुलांना वाटत असतं. ते वयच तसं असतं. पण आणखीही एक वय असतं. कोणत्याही पूर्वसूरींची पुण्याई न मानण्याचं वय. या वयात, आपल्या पालकांइतके वेडे पालक जगात कोणालाही लाभले नसतील, असंच मुलांना वाटतं. बहुतांशी वेळा या प्रतिक्रिया टोकाच्या असल्या, तरी क्वचित प्रसंगी त्या सत्यही असू शकतात.