Description
मराठी माणसाला नाटक हा आणखी एक अवयव विधात्याने बहाल केला आहे. असे अनेक कलावंत आहेत की आपली वहिवाटीची वाट सोडून नाटकाच्या बिकट वाटेकडे वळले आहेत. म्हणूनच आपली मराठी रंगभूमी एक वेगळाच घाट घेऊन मानाने मिरवित आहे. रंगभूमीच्या या हद्य आठवणी अगत्याने सांगण्याचा हेतु इतकाच की, आजच्या पिढीला आपल्या पूर्वसुरींची ओळख व्हावी, आठवण रहावी नि त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञता वाटावी.