Description
शकुंतला परांजपे! रँग्लर र. पु. परांजपे यांची कन्या. संततिनियमनाचे पायाभूत कार्य करणाऱ्या समाजकार्यकर्त्या. त्यांची दुसरी ओळख म्हणजे प्रख्यात नाटक-चित्रपटकर्त्या सई परांजपे यांच्या आई! पण या पुस्तकातून दिसतात वेगळ्याच शकुंतलाबार्इं – विविधछंदी, पशुप्रेमी, विचारवंत अशा बहुपेडी व्यक्तिमत्वाच्या त्यांच्या या बहुरंगी लिखाणात त्यांनी रंगवली आहेत – परांजपे कुटुंबातली माणसं, शेजारीपाजारी, गडीमाणसं. उधार माल देणारे दुकानदार, वस्ताद टांगेवाले. बसमध्ये कंडक्टरशी भांडणारी पुणेरी माणसं. दिल्लीच्या संसदेत आरडाओरडा करणारे खासदार. मांजरं, शेळ्या, घोडे, बैल यांच्या गमतीदार कहाण्या. खुमासदार शैलीत रंगलेलं हे ताजंतवानं चित्र म्हणजेच – निवडक शकुंतला परांजपे