Description
मुलांचं अडनिडं वय, हा पालकांचा परीक्षेचा काळ ! मुलांना स्वत:ची मतं फुटतात, आणि ती समजून घेताना, पालकांना घाम फुटतो. पालकांना वाटणारी आस्था, ही मुलांच्या दृष्टीनं लुडबूड ! पालकांनी केलेल्या सूचना, ही मुलांच्या नजरेत हुकुमशाही ! संवादासाठी सुरु केलेलं बोलणं, हमखास विसंवादाचं वळण घेतं. हा तिढा सोडवायचा कसा ? प्रक्रिया सोपी नाहीच, पण प्रयत्नसाध्य नक्की आहे. त्यासाठी सादर आहे, प्रिय पालक एका बालरोगतज्ज्ञ समुपदेशिकेचे अनुभवाचे बोल...