Description
प्रिय मधू गानू, तुमचे लेखन सरळ, साधे, नितळ, निरपेक्ष आणि आतल्या ऊर्मीने लिहिलेले, उत्स्फूर्त आहे. खरे आहे. लेखनाचा विषय झालेली माणसे आणि वाचक यांच्यामध्ये लेखकाचे लेखनकौशल्य उभे नाही. म्हणून आम्हांला वाटले की, या लेखांचे पुस्तक निघाले पाहिजे. पंचाहत्तरी हे निमित्त. विजय तेंडुलकर