Description
त्याच्या प्रवेशाआधी सजीवांचे होते निव्वळ गट - पशू, पक्षी, कीटक, जलचर, फळझाडे, फुलझाडे, वृक्ष, वेली... हा सारा पसारा त्यानं शिस्तीत मांडला. गटांमधल्या प्रत्येकाचं त्यानं बारसं केलं. माहीत असलेल्या सजीवांचं त्यानं केलं वर्गीकरण. प्रत्येक प्रकारच्या सजीवाला त्यानं बहाल केलं एकेक स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण नाव. आणि हे नावच बनलं त्या सजीवाच्या जातीची ओळख. जीवशास्त्रानं ही वैज्ञानिक पद्धत कायमची स्वीकारली.