Description
'ज्ञानपीठ विजेते तपोधन साहित्यिक वि.स.खांडेकर यांनी १९७२ साली अगत्याने लिहिलं, “काळाची नाडी रवींद्र पिंगे ह्यांना सापडली आहे. ते मर्माचं तेवढंच, पण काव्यात्मक लिहितात. त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत.” त्यानंतर पिंगे ह्यांनी जवळपास दोनशे मर्मग्राही व्यक्तिचित्रं लिहिली. घाटदार रचना,शब्दसौष्ठव आणि डोळस गुणग्राहकता ही भाऊसाहेब खांडेकरांनी टिपलेली पिंगे ह्यांची लेखनवैशिष्टयं ‘शतपावली’ ह्या पुरस्कारप्राप्त संग्रहात लखलखीत दिसतात. '