Description
हे अनुभवकथन आपल्याच समाजातील अंधांचे एक विश्व उजेडात आणतं. या विश्वात सुखदु:ख, आशानिराशा यांचे स्वाभाविक हेलकावे आहेत, विविध कलागुणांचे जोरदार आविष्कारही आहेत. हे लेखन सहानुभूतीच्या भाराने वाकलेले नाही, तर आशावादाने जगण्याची प्रेरणा देणारे आहे. मुख्य म्हणजे एका सर्वसामान्य गृहिणीच्या मातृत्वाचा परीघ कसा सहजपणे विस्तार पावत जातो, याचे प्रांजळ चित्रणही आहे.