Skip to product information
1 of 2

आणि मग एक दिवस By नसीरुद्दीन शाह

आणि मग एक दिवस By नसीरुद्दीन शाह

सुप्रसिद्ध अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचं हे आत्मचरित्र. नसीरुद्दीन शाह यांनी या पुस्तकात जे लिहिलं आहे ते वेधक आहे. वैविध्यपूर्ण आहे. त्यांचं लिखाण परखड आहे. कुठेही आडपडदा न ठेवता ते बेधडक...

Regular price Rs. 600.00
Sale price Rs. 600.00 Regular price Rs. 650.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Sub total

Rs. 600.00
View full details

सुप्रसिद्ध अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचं हे आत्मचरित्र. नसीरुद्दीन शाह यांनी या पुस्तकात जे लिहिलं आहे ते वेधक आहे. वैविध्यपूर्ण आहे. त्यांचं लिखाण परखड आहे. कुठेही आडपडदा न ठेवता ते बेधडक लिहितात. स्वतःच्या प्रमादांबद्दलसुद्धा ते आत्मसमर्थन करण्याचा जरासुद्धा प्रयत्न करत नाहीत. हीबाची — आपल्या मुलीची, तिच्या बालपणी केलेली अवहेलना; आईवडिलांच्या भावनांची पर्वा न करता फिल्मी दुनियेची दारं ठोठावायला मुंबईला केलेलं पलायन; चोरून पाहिलेले सिनेमे; गांजाची साथसंगत वगैरे वर्णनं वाचून काहीशा निर्मम इसमाची प्रतिमा डोळ्यांपुढे तरळते. पण मग नकळत पुस्तकाच्या पानांमध्ये दडलेल्या काही हळुवार आठवणी पुढे येतात आणि मनाचा ठाव घेतात. याखेरीज रंगभूमीवरची त्यांची वाटचाल, हिंदी चित्रपटांत त्यांनी साकारलेल्या विविधरंगी व्यक्तिरेखांची माहिती, आणि त्यांच्या बालपणापासूनच्या व्यक्तिगत आयुष्यातले अनेक रंग या आत्मचरित्राला ‘दिलचस्प’ रूप देतात. या साऱ्यांहून या आत्मचरित्राचं अधिक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नसीरजींची उत्तम अभिनेता होण्याच्या आपल्या इप्सिताप्रती असलेली अमोघ श्रद्धा! त्यासाठी त्यांनी घेतलेला अखंड शोध. आयुष्यभर केलेली अविरत मेहनत. प्रत्येक वाचकाला प्रेरणादायी ठरेल असं हे आत्मचरित्र आहे.