Description
बारा भारतीय 'जीनियस' व्यक्ती, त्याचं कार्य आणि संशोधन याविषयीची अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख लिखित ही पुस्तकं सर्वच विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कुतूहल असलेल्या कुठल्याही वयोगटातल्या वाचकानं वाचावीत अशी आहेत. ही पुस्तकं अतिशय प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि रसाळ असून सोप्या, सुंदर आणि ओघवत्या भाषेनं ती वाचकांना खिळवून ठेवतील. ही पुस्तकं वाचून भारतीय शास्त्रज्ञ, गणितज्ञ, वास्तुशिल्पी आणि अभियंता यांच्याविषयी आपल्याला असलेला सार्थ अभिमान आणखीनच दुणावेल. मराठी साहित्यात असलेल्या व्यक्तिचित्रणात्मक लेखनात ही पुस्तकं अमूल्य भर घालणारी आहेत. यातील प्रत्येक पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिचित्रण म्हणजे ज्ञानपीठाची लघू आवृत्तीच !