Description
आपला समृध्द आणि प्रगत मायदेश मागे सोडून डॉ. आयडा वेलूरला आल्या. धुळीने भरलेल्या, सततच्या दुष्काळाने आणि म्हणून दारिद्रयाने गांजलेल्या भुकेकंगाल प्रदेशाला त्यांनी आपलं म्हटलं. सलग पन्नास वर्ष या प्रदेशाची दुखणी-खुपणी निस्तरताना त्यांनी एक स्वप्न उराशी बाळगलं. ते साकार करीत असताना त्या या मातीत मिसळून गेल्या. एक होता कार्व्हर या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांचे एका दुर्लक्षित विषयावरील पुस्तक – डॉ. आयडा स्कडर