Description
विसाव्या शतकाच्या प्रारंभी जन्मलेल्या कुमुदच्या भाग्यात एकविसाव्या शतकातील स्त्रीच्या संधी लिहिल्या होत्या. प्रागतिक विचारांचे धनसंपन्न आईवडील, वसतिगृहात राहून घेतलेले पदव्युत्तर शिक्षण, टेनिसमध्ये मिळवलेले प्रावीण्य, उत्तम पगाराची नोकरी आणि विवाहाआधीच स्वकर्तृत्वावर मिळवलेली पुण्यातील निवासाची जागा... अशा या काळाच्या पुढे चालणा-या उच्चशिक्षित स्त्रीने विवाहानंतर मात्र परिस्थितीची अनुकूलता असूनही ‘गृहिणी' या भूमिकेस प्राधान्य दिले. म्हणूनच कुमुदच्या आत्मकथनात स्त्रीस्वातंत्र्याची फळे चाखलेल्या उच्चशिक्षित स्त्रीचे परखड विचारविश्वही डोकावते आणि तिच्यावरील पारंपरिक मूल्यांचा पगडाही दिसतो. एका अर्थाने हे केवळ कुमुदचे आत्मकथन राहत नाही; त्यातून विसाव्या शतकात महाराष्ट्रातील स्त्रीने अनुभवलेली अनेक स्थित्यंतरे, संघर्ष आणि दुविधासुद्धा प्रतिबिंबित होतात.