Description
एके काळी फक्त ‘आयक्यू’ महत्त्वाचा मानला जात होता. आज त्याच्या बरोबरीने किंबहुना काकणभर जास्तच महत्त्व आले आहे ‘ईक्यू’ ला - इमोशनल कोशंट वा भावनिक निर्देशांकाला! आयुष्यात हा ईक्यू जपायचा असेल, तर शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यही सुदृढ हवे. आजच्या वेगवान जीवनात जगण्याच्या धावपळीत माणसाची दमछाक होत आहे. व्यक्तिगत जीवनापासून कौटुंबिक / सामाजिक / व्यावसायिक / सांस्कृतिक जीवनापर्यंत प्रत्येक पातळीवर विविध ताणतणावांना सामोरे जाणे व्यक्तीला भाग पडत आहे. अशावेळी आधार लाभतो कौन्सेलरचा आणि कौन्सेलिंगचा, मानसिक आरोग्याबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांचा. जवळजवळ साडेतीन तपांचा काळ या क्षेत्रात काम केलेल्या अनुभवी कौन्सेलरनी आपल्या अनुभवांवर आधारित कथनातून मानसिक आरोग्याचा, समस्यांचा आणि उत्तरांचा घेतलेला वेध.