Description
'गुणगुणणारे छोटे छोटे कीटक असोत वा रंगबिरंगी पक्ष्यांचे थवे, समुद्राचे गहिरे तरंग असोत वा आकाशाची मुग्ध निळाई, निसर्गाच्या सा-याच रूपांवर रेचेलनं मनापासून प्रेम केलं... आणि म्हणूनच मानवानं केलेला कीटकनाशकांचा मनमानी वापर तिला सहन झाला नाही. निसर्गाचं प्रेम, ध्यास अन् रेचेलची तळमळ, अभ्यास याची परिणीती म्हणजेच ‘सायलंट स्प्रिंग’ हे केवळ पुस्तक नव्हतं, तो होता पर्यावरणासाठीचा लढा. त्यानंच जन्म दिला, जागतिक पर्यावरण चळवळीला. सा-यांना पर्यावरणासंदर्भात खडबडून जागं करणा-या रेचेलची ही चरितकहाणी... '