Description
'जॉर्ज फर्नांडिस! भारताच्या राजकारणातील एक वादळी अन् बहुरंगी व्यक्तिमत्त्व. रेल्वेरुळांवर पोलिसांचा मार खाणारे जॉर्ज. उद्योगपतींना चळचळा कापायला लावणारे जॉर्ज. स.का.पाटलांना धूळ चारणारे ‘जायंट किलर जॉर्ज. चुटकीसरशी मुंबई बंद करणारे बंदसम्राट जॉर्ज. भारतीय रेल्वेच्या चाकांना थांबवणारे जॉर्ज. मंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडणारे जॉर्ज. सरकारचं समर्थन अन् विरोध सारख्याच कुशलतेनं करणारे संसदपटू जॉर्ज. इंदिराजींपासून अटलजींपर्यंत अनेकांबरोबर सहा दशकं राजकारणात वावरलेल्या - स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासावर आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या - राजकीय नेत्याचं प्रोफाईल'