Description
'‘ठाकरे म्हणजे अर्धशतकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या वेंâद्रस्थानी असलेले घराणे. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक. ‘शिवसेना स्थापन करणारे बाळासाहेब ठाकरे म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात दरारा असलेले नाव. पण बाळासाहेबांच्या डोळ्यांदेखत ‘शिवसेनेत पूâट पडली अन् ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना जन्माला आली. उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे हे दोघे एकमेकांविरोधात उभे ठाकले ! दोन सेना. दोन सेनापती. काय असणार या दोघांची रणनीती अन् नियती ? महाराष्ट्राच्या राजकारणातील एका विलक्षण सत्तासंघर्षाचा विविध अंगांनी घेतलेला वेध '