Description
अरब जग म्हणजे इस्लाम अन् पेट्रोडॉलर. अरब जग म्हणजे वाळवंट अन् मरूद्यानं. अरब जग म्हणजे खजूर अन् उंट. अरब जग म्हणजे अमाप श्रीमंती अन् उन्मादी दहशतवाद. नानाविध समज अन् गैरसमजांच्या बुरख्याआड दडलेलं हे जग आहे तरी कसं? इतिहास - राजकारण - समाजकारण - धर्मकारण - अर्थकारण -लोकजीवन अशा अनेक धाग्यांचा धांडोळा घेत वाळवंटातल्या या वेगवेगळया पाऊलखुणांचा शोध म्हणजे धागे अरब जगाचे