Description
व्यक्ती तितक्या प्रकृती आणि देश तितक्या संस्कृती. देशोदेशींच्या संस्कृतींचे रंग किती आगळेवेगळे! आजच्या जागतिकिकरणाच्या जमान्यात देशादेशांमधील चलनवलन वाढतंय. आज इथे तर उद्या तिथे, या वेगानं जगाला कवेत घेऊ पाहणा-या ‘ग्लोबल नोमॅड्स’ची- जागतिक भटक्याविमुक्तांची- संख्या दिवसेंदिवस वाढतेय. वेगवेगळ्या देशांशी संपर्क ठेवताना साहजिकच तिथल्या स्थानिक संस्कृतीशी संबंध येतोय. हा संबंध परस्परांना टोचणारा-बोचणारा ठरू नये, उभयपक्षी लाभदायक अन् सुखकारक ठरावा म्हणून आंतरसांस्कृतिक साक्षरतेची गरज जाणवतेय. अशी साक्षरता मिळवायची म्हणजे अनोळखी परक्याला समजून घ्यायला शिकायचं, एक दोन वैयक्तिक अनुभवांवरून सार्वत्रिक निष्कर्ष काढण्याची घाई न करता थोडा समजूतदारपणा दाखवायचा, परक्या संस्कृतीचा तसा स्वभावरंग का तयार झाला, हे जाणून घ्यायचं .... अशी आंतरसांस्कतिक साक्षरता पसरवण्याचं काम करणारी विद्याशाखा म्हणजे ‘इंटरकल्चरल कम्युनिकेशन’. या विद्याशाखेत मनापासून रमलेल्या वैशाली करमरकर यांनी या वेगळ्या क्षेत्राची करून दिलेला ही ओळख... एका नव्या जगाची कवाडं खोलणारी... विश्र्वबंधुत्वाचं मूल्य मनामनात जागवणारी...