Description
'काही स्त्रिया सावलीसारख्या जगतात, तर काही स्वयंप्रकाशी. सावल्यांच्या वाटयाला नेहमी सन्मानच येतो, असे नाही. कधी उपेक्षा, कधी गैरसमज, कधी झांटिपीचा शिक्का असेही पदरात पडते. तर स्वयंप्रकाशी ज्योतींनाही तेजाबरोबर दाहकता, नवी वाट दाखवणा-या प्रकाशासवे विरोधाची अन् टीकेची काजळी सोसावी लागते. समर्पित, प्रेरणादायी जीवन आणि कर्तृत्वाने काळाच्या ओघावर ठळक ठसा उमटवणा-या वेचक स्त्रियांच्या चरितकथा छाया आणि ज्योती '

