Description
विक्रम सेठ यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेली `सुटेबल बॉय' ही कादंबरी ‘राजहंस’ नं `शुभमंगल' (अरुण साधू) या नावानं प्रकाशित केली. त्यानंतर गौरी डांगे या नव्या दमाच्या लेखिकेची `3, झाकिया मॅन्शन' ही कादंबरी त्याच नावानं आता मराठीत येतेय. भारतीय लेखकांनी इंग्रजी साहित्यामध्ये आपला ठसा उमटवणं आता नवीन राहिलेलं नाही. आता मराठी वाचकांना नवीन काय असेल, तर आपल्या या अतिविशाल भारताची अठरापगड कॅलिडोस्कोपिक संस्कृती हा प्रत्येक भारतीय लेखक पकडतो कशी ? `3, झाकिया मॅन्शन'मधल्या करीम अली कुटुंबाची आणि मानस खेरची ही गोष्ट, एक वेगळंच जग आपल्यापुढे मांडते आणि जिवाला वेढून टाकते, एवढं नक्की.