Description
२ डिसेंबर १९८४ भोपाळच्या युनियन कार्बाइड कारखान्यात स्फोट. विषारी वायू भोपाळभर पसरला. हजारो लोक मृत्यूमुखी पडले, शेकडो लोक अपंग झाले. या कोलाहलात शेतमजूर ते पाश्चात्य इंजिनीयर सगळेच भरडले गेले. हे सारे कसे घडले? का घडले? डेमिनीक लापिये आणि जाविएर मोरो या दोघांनी कसून शोध घेतला. सरकारी अहवाल काय म्हणतात? वर्तमानपत्रे काय सांगतात? पीडित माणसे काय बोलतात? या सर्वांचा आधार घेऊन- उद्ध्वस्त समाजजीवन, सामाजिक रेटे - ही माणसाच्या आशेचे चिवट कोंभ यांच्या धाग्यांतून विणलेली ही कादंबरी !